चिमुकल्यांचा सुटी मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर ! - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:20+5:302021-07-15T04:23:20+5:30

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांना पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग करण्यात आला. मात्र, हे ऑनलाइन ...

Chimukalya's holiday mood remains; Forget the study! - A | चिमुकल्यांचा सुटी मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर ! - A

चिमुकल्यांचा सुटी मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर ! - A

Next

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांना पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग करण्यात आला. मात्र, हे ऑनलाइन शिक्षण प्रभावी ठरू शकले नाही. त्यात कोरोनाची दुसरी लाट बीड जिल्ह्यात प्रभावी राहिली. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना जास्त असू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे याहीवर्षी मुलांना घरात बसून अभ्यास करावा लागणार, अशी परिस्थिती आहे, तर दुसरीकडे चिमुकल्यांचा सुटीचा मूड कायम असून, अभ्यासाचा मात्र त्यांना विसर पडला आहे.

पालकांनी घरातच घ्यावी शाळा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांना शाळेत पाठवणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे शाळेतील ऑनलाइन अभ्यास ठरावीक वेळ देऊन मुलांकडून करून घेणे योग्य ठरेल. मुलांना मोबाइलमध्ये दीक्षा, स्वाध्याय विविध शैक्षणिक ॲप चालू करून ते पाहण्यासाठी सांगून पालकांनी त्यांचा अभ्यास करून घेणे आवश्यक बनले आहे. यामुळे मुले अभ्यासात रमतील आणि बाहेर पडणार नाहीत. --

-----------

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

शाळेत शिक्षकांच्या धाकाने मुले दररोज तीन ते चार तास अभ्यास करत होती. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठे अंतर निर्माण झाले आहे. परिणामी शिक्षकांबद्दलची भीती राहिली नाही.

ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुले माेबाइलवर गेम खेळतात. कार्टून आणि व्हिडिओ कित्येक तास पाहत बसतात. ग्रुपवर अभ्यास मिळाल्यावर फाइल स्पष्ट दिसत नाही. नेट बंद पडले, शिक्षकांचा आवाज येत नाही अशी विविध कारणे मुले सांगतात.

------

मुलांना अक्षरओळख होईना

मागील वर्षी पहिलीत प्रवेश घेणारी मुले थेट दुसरीत गेली आहेत. मात्र, प्राथमिक अवस्थेत पुरेसे प्रभावी शिक्षण गेल्या दोन वर्षांपासून त्यांना मिळालेले नाही. या मुलांना शाळा, वर्ग, शिक्षक अद्याप समजलेले नाही. त्यामुळे दोन्ही वर्गांतील मुलांच्या शैक्षणिक विकासावर कमालीचा परिणाम झाला आहे. शाळा बंद असल्याने मुलांना काय शिकवावे, हेही पालकांना कळेनासे झाले आहे.

------------

पालकांची अडचण वेगळीच मुले शिक्षकांच्या धाकाने अभ्यास करतात. मात्र, कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून सगळे काही बिघडले आहे. अनेकदा समजावून, रागावून, धाक दाखवूनही मुले अभ्यास करत नाहीत. शाळा सुरू व्हाव्यात. - बाबासाहेब कानडे, पालक, कुर्ला, ता. बीड.

------------

शेतात जावे लागते. त्यामुळे मुलांकडे पालकांचे मोबाइल नसतात, तर काही पालक त्यांच्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर असतात. ऑनलाइन अभ्यासावेळी नेमका फोन नसल्याने मुले नंतर अभ्यास करत नाहीत. -संतोष पाटील, पालक, कुर्ला ता. बीड.

------------

Web Title: Chimukalya's holiday mood remains; Forget the study! - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.