चिंचाळा-माटेगाव रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:29+5:302020-12-25T04:27:29+5:30

बीड : वडवणी तालुक्यातील चिंचाळा ते परडी माटेगाव हा रस्ता सध्या उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने छोटे-मोठे अपघात घडत ...

Chinchala-Mategaon road was dug up | चिंचाळा-माटेगाव रस्ता उखडला

चिंचाळा-माटेगाव रस्ता उखडला

Next

बीड : वडवणी तालुक्यातील चिंचाळा ते परडी माटेगाव हा रस्ता सध्या उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. तसेच या रस्त्यावरून शेतकऱ्यांचीही वर्दळ असते. त्यांनाही त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने संताप

बीड : शहरातील अनेक भागांत आजही नगरपालिकेच्या घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी वेळेवर येत नसल्यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. काही वेळेस परिसरात कचरा साचून राहत असल्याने दुर्गंधी सुटत आहे. स्वच्छता विभागाने याचे योग्य नियोजन करून घंटागाड्या वेळेत पाठविण्यासह कचरा उचलून न्यावा, अशी मागणी बीडकरांमधून होत आहे.

अवैध धंदे वाढले

पाटोदा : काही दिवसांपूर्वी बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होते. याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास आहे. वारंवार सांगूनही याकडे पाटोदा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे ठाणे हद्दीतील नागरिक सांगत आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

घाणीचे साम्राज्य

बीड : शहरातील माळीवेस भागातील महावितरण कार्यालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. तसेच गवतही उगवल्याने भीतीचे वातावरण आहे. स्वच्छता होत नसल्याने डासही वाढले आहेत. परिसर स्वच्छ करण्याची मागणी सामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

सांडपाणी रस्त्यावर

बीड : शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागात नाल्या व्यवस्थित नसल्याने आणि अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई होत नसल्याने आतील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

गस्त वाढवावी

बीड : गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. या चोरांच्या बंदोबस्तासाठी ग्रामीण व शहरी भागात रात्रीच्या गस्त वाढविण्यास सुरुवात करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाऊ लागली आहे.

गुरांना उपचार मिळेनात

चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात. मात्र, त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी अनेक वेळा उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी केली जात आहे.

बाजारपेठेला फटका

वडवणी : शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित होत आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने व्यावसायिकांवर परिणाम होऊ लागला आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या बाजारपेठेला याचा मोठा फटका बसत आहे. महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.

रस्त्यावर खड्डे वाढले

धारूर : धारूर ते आसरडोह या १४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारे वाहनधारक वैतागले आहेत. या रस्त्याचे अंतर कापण्यासाठी ३५ ते ४० मिनिटे लागत असून, वाहने खराब होण्याची शक्यता वाढली आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

वाहनांना बाभळीचा अडथळा

गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यावर विविध ठिकाणी बाभळीचा वेढा वाढल्याने येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या झाडांच्या खाली आलेल्या फांद्या व काटे ओरबाडत असल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागते. रस्त्यांना अडथळे ठरणाऱ्या फांद्या तसेच बाभळी तोडण्यात याव्यात, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

Web Title: Chinchala-Mategaon road was dug up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.