नाताळाच्या दिवशीच ख्रिश्चन समाजाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:33 AM2019-12-24T00:33:29+5:302019-12-24T00:34:52+5:30
महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज वेगवेगळ्या अडचणीला तोंड देत आहे. या समाजाच्या सत्तर वर्षांपासून काही मागण्या प्रलंबित आहे. त्यामुळेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने २५ डिसेंबर नाताळाच्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी दिली.
बीड : महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज वेगवेगळ्या अडचणीला तोंड देत आहे. या समाजाच्या सत्तर वर्षांपासून काही मागण्या प्रलंबित आहे. त्यामुळेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने २५ डिसेंबर नाताळाच्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ख्रिश्चन समाजाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. यात एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. बीड येथील कब्रस्थानाची संरक्षक भिंत तात्काळ बांधावी, मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ तात्काळ स्थापन करा, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ व विधान परिषदेवर ख्रिश्चन समाजाला प्रतिनिधीत्व द्या या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाताळाच्या दिवशी ख्रिश्चन समाजातर्फे उपोषण करण्यात येणार आहे.
यात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमोल शिंदे, प्रेमविजय भालतिलक, किशोर पाटील, अरूण गायकवाड, नीलिमा रामटेके, शीला बन्सोडे, अशोक थोरात, स्तवन घुले, सुप्रिया तोडे, प्रतीक भालतिलक, राजू वल्लपल्ली, आशिष पाखरे, शिलास पाटोळे, क्षितिज गायकवाड, शिल्पा शिंदे, शर्मिला पाटील, मरियन रेड्डी, नितीन शिंदे यांनी केले आहे.