सिनेस्टाईल धावत्या वाहनांवर चढून ते करायचे चोरी; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, एक फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 05:15 PM2022-04-20T17:15:23+5:302022-04-20T17:24:56+5:30

धावत्या वाहनांवर चढून त्यावरील ताडपत्री फाडून आतील अन्नपदार्थ, महागड्या वस्तू चोरी करायचे

cinestyle theft; Stealing from speeding vehicles; Police arrested the two, one absconding | सिनेस्टाईल धावत्या वाहनांवर चढून ते करायचे चोरी; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, एक फरार

सिनेस्टाईल धावत्या वाहनांवर चढून ते करायचे चोरी; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, एक फरार

Next

केज ( बीड ) : मध्यरात्री मांजरसुंभा-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या मालवाहू वाहनांवर चढून त्यातील साहित्य, मोल्यवान वस्तू  चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आणखी एक आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

केज तालुक्यातील शिंदी फाटा आणि कोरेगाव दरम्यान धावत्या वाहनांवर चढून त्यावरील ताडपत्री फाडून आतील अन्नपदार्थ, महागड्या वस्तू चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि जोगदंड, मंगेश भोले, अशोक नामदास, महादेव बहीरवाळ आणि दिलीप गित्ते यांच्या पथकाने बुधवारी पहाटे ( दि. १९ )  ५:०० वाजेपासून कोंबिग ऑपरेशन राबविले. यावेळी केज-बीड महामार्गावर सावंतवाडी पाटीजवळ तिने संशयित पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. 

दरम्यान, पोलीस पथकाने महादेव कल्याण पवार, सुंदर चंदर पवार, बबन कल्याण पवार यांचा पाठलाग सुरु केला. यात महादेव कल्याण पवार , सुंदर चंदर पवार यांना पोलिसांनी पकडण्यात यश आले तर बबन कल्याण पवार हा पळून गेला. पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून दि. १९ एप्रिल रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं.  १२६/२०२२ भा. दं. वि. ४०१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.

चोरीसाठीचे साहित्य आढळले 

साहित्य चोरी केल्यानंतर  चालत्या वाहनातून उतरता वेळी मार लागू नये म्हणून चोरटे एकावर एक चार ते पाच पॅन्ट आणि त्याच्या मागील बाजूस टायरचे रबर लावून ते वापरत असलेले साहित्य आणि ताडपत्री फाडण्यासाठीची धारदार कत्ती पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: cinestyle theft; Stealing from speeding vehicles; Police arrested the two, one absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.