कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:37 PM2020-03-16T23:37:02+5:302020-03-16T23:37:51+5:30

जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी ३१ मार्चपर्यंत अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळाव्यात, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिले. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेश बंद असणार आहे.

Citizens access to the office is closed | कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद

कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद

Next
ठळक मुद्देसंसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : शासकीय कार्यालय प्रमुखांना आदेश, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

बीड : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी ३१ मार्चपर्यंत अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळाव्यात, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिले. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेश बंद असणार आहे. नागरिकांनी देखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गाठीभेटी टाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आदेशात पुढे म्हटले की, बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित कठोर उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ६६ शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणाºया सर्व अभ्यागतांना (नागरिकांना) ३१ मार्चपर्यंत प्रवेशबंद केला आहे. तसेच, कार्यालय प्रमुखांनी कार्यालयीन कामकाज अधिकाधिक संगणकावर करण्यासाठी ई-मेल, दुरध्वनी व तत्सम मागार्चा वापर करावा. कार्यालयात गर्दी जमणार नाही, यासाठी आवश्यक ते उपाय करावेत, असे आदेशात म्हटले आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी, माणुसकीच्या विजयासाठी एक व्हा
बीड : कोरोना या आपत्तीला हरविण्यासाठी धर्म भाव विसरून माणुसकीच्या विजयासाठी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.१६) धर्मगुरू, मंदिरांचे विश्वस्त, मौलवींची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह जिल्हाभरातून आलेले मौलवी, मंदिरांचे विश्वस्त पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि विविध शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या आजारासोबत सुरू असलेल्या या लढाईत तुम्ही सर्व माझे सोबती आहात. सगळ्यांच्या सहकार्यातून या संसर्गाच्या साथीला जिल्ह्यात येण्यापासून आपण रोखणार आहोत. आपण काय करणार आहोत हे आत्ताच ठरविणे गरजेचे आहे. यात कसलाही उशीर नको. आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित करणे गरजेचे आहे. या पवित्र कार्यात योगदान देणे गरजेचे असून यामध्ये कोणताही धर्म, जात असा भेदभाव नाही....माणुसकीच महत्त्वाची असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले. मशिद, मंदिर आदी धार्मिक ठिकाणी एकावेळी पाच ते दहा व्यक्तींपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. नमाज अथवा प्रार्थना मंदिर व मिस्जद मध्ये न जाता घरीच पूर्ण करावेआपला परिवार, समाज आणि शहराला सुरक्षित करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी कोरोना या शत्रूला आपणाला हरवायचे आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. हा विषय जीवनाशी निगडीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, परळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेश देशमुख, जमियात उलमा, मौलाना इकराम, मुफ्ती असपाक, सलीम जहांगिर , अ‍ॅड शेख शफी, अ‍ॅड. ख्वाजा , मुफ्ती् आरिफ अशा अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: Citizens access to the office is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.