नागरिकच गाफील; रस्त्यांवर फिरणारे ७८ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:04+5:302021-05-05T04:56:04+5:30
बीड : विनाकरण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पकडून अँटिजन चाचणी केली जात आहे. दोन दिवसांत तब्बल ७८ लोक कोरोनाबाधित आढळले ...
बीड : विनाकरण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पकडून अँटिजन चाचणी केली जात आहे. दोन दिवसांत तब्बल ७८ लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. यावरून नागरिक किती गाफील राहून फिरतात, याचा प्रत्यय येतो. यामुळेच बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांसह कारवाया केल्या जात आहेत. तसेच लॉकडाऊनही करण्यात आलेले आहे. असे असले तरी काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. याच लोकांना आळा बसावा, यासाठी प्रशासनाने दोन दिवसांपासून बीड व अंबाजोगाईत १३ पथकांद्वारे अँटिजन चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात पहिल्या दिवशी ७१० लोकांची चाचणी केली होती. यात ४३ बाधित आढळले, तर मंगळवारी ४६९ लोकांची चाचणी केली. यात ३५ जण बाधित आढळले. दोन दिवसांत ७८ लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर. बी. पवार यांनी ही माहिती दिली.
---
एकूण चाचण्या - ११७९
एकूण कोरोनाबाधित - ७८