रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची आजपासून होणार अँटिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:07+5:302021-07-31T04:34:07+5:30

बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे; परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह ...

Citizens coming from districts with high number of patients will get antigen from today | रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची आजपासून होणार अँटिजन

रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची आजपासून होणार अँटिजन

Next

बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे; परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियमात शिथिलता मिळाली नाही. जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यांत बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून, यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून अँटिजन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी ३१ जुलैपासूनच करावी, असे निर्देश मुंडे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.

कोरोना आणि लसीकरणाबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते, बैठकीसाठी आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा, अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आरोग्य व प्रशासन यंत्रणांनी तिसऱ्या लाटेच्या धोक्यासाठी सज्ज राहावे. जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, औषधी, इंजेक्शन्स, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता व सुसज्जता ठेवण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

Web Title: Citizens coming from districts with high number of patients will get antigen from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.