माजलगावात नागरिकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:12+5:302021-06-10T04:23:12+5:30
माजलगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बायपास रस्ता व इतर भागातील रस्त्यांची कामे आणि प्रभाग क्र.१० ...
माजलगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बायपास रस्ता व इतर भागातील रस्त्यांची कामे आणि प्रभाग क्र.१० मधील भूमिगत मुख्य नालीचे काम अर्धवट ठेवल्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा नागरिक या गटारीत पडून जखमी झाले आहेत. या भूमिगत नालीचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरातील विविध भागात रस्ता आणि गटारींचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. तसेच प्रभाग १० मधील भूमिगत नालीचा स्लॅब अनेक ठिकाणी फुटल्याने जोशी गल्ली येथील नागरिकांचे अनेक दिवसांपासून ये-जा करताना हाल होत होते. त्यात नग परिषदेने या भूमिगत नालीचे काम काही दिवसांपूर्वी सुरू केले आहे. यासाठी पूर्ण रस्ता खोदण्यात आला असून, हे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवसांपासून येथील महिला नागरिकांना घरातून बाहेर ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत. वेळप्रसंगी अनेक नागरिक या नालीत पडून जखमी झाले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक नागरिक घरात होते; मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्याने ये-जा वाढली आहे. नालीत पडणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे तसेच नालीचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे जोशी गल्ली येथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन खोदलेली नाली व रोड तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी केली.
या खड्ड्यामध्ये आतापर्यंत ८ ते १० नागरिक पडून गंभीर जखमी झाले आहेत. लहान मुलेदेखील पडण्याची शक्यता आहे. तात्काळ या रोडचे व नालीचे काम पूर्ण करावे. २ ते ३ दिवसात हे काम झाले नाही, तर प्रभाग क्र .१० मधील सर्व नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात दिला आहे.
===Photopath===
090621\purusttam karva_img-20210609-wa0044_14.jpg