नागरिकांचा मॉर्निंग वॉककडे ओढा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:33 AM2021-02-10T04:33:33+5:302021-02-10T04:33:33+5:30

प्रामुख्याने हिवाळा हा ऋतु आरोग्यासाठी अत्यंत चांगला असतो. या काळात भूक वाढते. शरीर तंदुरूस्त बनते, हिवाळ्यात मॉर्निंग वॉक केल्याने ...

Citizens flocked to the Morning Walk | नागरिकांचा मॉर्निंग वॉककडे ओढा वाढला

नागरिकांचा मॉर्निंग वॉककडे ओढा वाढला

Next

प्रामुख्याने हिवाळा हा ऋतु आरोग्यासाठी अत्यंत चांगला असतो. या काळात भूक वाढते. शरीर तंदुरूस्त बनते, हिवाळ्यात मॉर्निंग वॉक केल्याने आपले हृदय, फुफ्फूसाची कार्यक्षमता वाढते. तसेच पहाटे चालायला लागल्याने दिवसभर ताजे तवाणे वाटते. सकाळचा ऑक्सीजन युक्तवायु आणि प्रदुषण विरहीत शुद्ध हवा मिळाल्याने शरीर निरोगी बनते. प्रामुख्याने मोठ्या रस्त्यावरून समुहाने चालताना अनेक नागरिक दिसून येत आहेत. मॉर्निंग वॉकचे फायदे अनेक आहेत. हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्तभिसण वाढते, रक्तदाब साखर, अटोक्यात राहते, वजन नियंत्रीत राहण्यास मदत होवून भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, शरिराची प्रतिकारशक्ती वाढल्याने आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. आरोग्याच्या धास्तीने सध्या जीवनमान काहीसे खडतर झाले आहे. बैठे काम, व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. हे पहावयास मिळते. त्यामुळे तरूणपणीच अनेक आजार उद्भवतात अशा विविध कारणांमुळे सर्वच वयोगटात पायी चालण्याचे म्हणजेच मॉर्निंग वॉक याकडे ओढा वाढला आहे.

रोज सकाळी लवकर उठल्याने ताजे तवाणे वाटते. सकाळची थंडी शरिराला चांगली असते, सकाळी चालायला लागल्याने शुद्ध हवा मिळते. मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते.

- डॉ.राहुल धाकडे (सामाजिक कार्यकर्ते)

Web Title: Citizens flocked to the Morning Walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.