नागरिकांनो नियम पाळा, प्रशासनाला सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:51+5:302021-02-23T04:50:51+5:30
कड: मागील वर्षी एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर २ हजार ४५ जणांना कोरेानाची ...
कड: मागील वर्षी एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर २ हजार ४५ जणांना कोरेानाची लागण झाली. यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत कपात होत असतानाच पुन्हा रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा गावे बंद करण्याची वेळ येऊ नये, यासाठी नियमांचे पालन केले जावे, असे आवाहन आष्टी तालुक्यातील महसून, पोलीस आणि आरोग्य प्रशासनाने केले आहे.
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे आजवर रुग्ण सापडले असून मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले होते. नंतर कोरोना आटोक्यात आला. मात्र शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. याचा परिणाम गावापातळीवर होण्याची शक्यता आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी व्यक्त केली. तहसील कार्यालयात नुकतीच प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून, भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला जाणार असून, गर्दीच्या ठिकाणी वारवार लक्ष ठेवून नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासाठी जनजागृतीची करण्यात येणार असल्योच तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी सांगितले.
आष्टी, पाटोदा, शिरूर या तीनही तालुक्यात विनामास्क असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असून जनजागृती सुरू आहे. जनतेनेदेखील नियमाचे पालन करावे असे आवाहन, आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांनी केले आहे.