स्वॅब दिल्यानंतर नागरिकांनी होम क्वारंटाईन राहणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:35+5:302021-04-29T04:25:35+5:30

वडवणी येथे संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यासाठी दोन दिवसांचा विलंब लागत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गात ...

Citizens must remain home quarantine after swab | स्वॅब दिल्यानंतर नागरिकांनी होम क्वारंटाईन राहणे आवश्यक

स्वॅब दिल्यानंतर नागरिकांनी होम क्वारंटाईन राहणे आवश्यक

Next

वडवणी येथे संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यासाठी दोन दिवसांचा विलंब लागत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गात वाढ होत तर नाही ना अशी शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोना आजाराचे निदान करण्यासाठी सध्या अँटिजंन आणि आरटीपीसीआर या दोन चाचण्या घेतल्या जात आहेत. अँटिजेन चाचणीमुळे संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे किंवा नाही, याचे निदान लगेच होत आहे. मात्र, आरटीपीसीआर चाचणीचे निदान यायला दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत संबंधित व्यक्तीने होम क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. मात्र, असे न करता आरटीपीसीआर स्वॅब दिलेली व्यक्ती पॉझिटिव्ह असली तरी ती सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्याला काही झालेच नाही, या आविर्भावात कुटुंबात किंवा समाजात खुलेआम फिरतो व अनेक जणांच्या संपर्कात येतो. यामुळे कुटुंबातील किंवा समाजातील अन्य व्यक्तींना संसर्गाचा धोका होऊ शकतो. यामुळे आरटीपीसीआर स्वॅब दिल्यानंतर नागरिकांनी होम क्वारंटाईन राहण्याची दक्षता घेतली पाहिजे, असे डाॅ. घुबडे, डाॅ. चौधरी म्हणाले.

Web Title: Citizens must remain home quarantine after swab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.