विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:35+5:302021-04-21T04:33:35+5:30
अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूकअंबाजोगाई : शहरातील अंतर्गत रस्ते अतिशय अरूंद असतानाही दिवसा शहरातील रस्त्यावरून जड वाहतूक होत आहे. मंडीबाजार, ...
अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूकअंबाजोगाई : शहरातील अंतर्गत रस्ते अतिशय अरूंद असतानाही दिवसा शहरातील रस्त्यावरून जड वाहतूक होत आहे. मंडीबाजार, गुरूवारपेठ या परिसरात मोठी वाहने व जड वाहने सातत्याने येत जात असल्याने याचा मोठा त्रास नागरिकांना निमूटपणे सहन करावा लागतो. अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक रात्रीच्या वेळी करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
उघड्या रोहित्रांमुळे अपघाताचा धोका
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील मोंढा परिसरात असलेले विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. तुटक्या फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहित्र उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने नवे फ्यूज बसविण्याची मागणी होत आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन
माजलगाव : शहरातील प्रमुख मार्गावरच न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पुन्हा स्वच्छता मोहिमेची मागणी नागरिकांतून होत आहे.