बीड शहरातील साचलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:53+5:302021-08-24T04:37:53+5:30

बीड : बीड शहरात विविध भागात जमा होणारा कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. परंतु, मागील काही दिवसांपासून डंपिंग ...

The city of Beed began dumping waste at the dumping ground | बीड शहरातील साचलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यास सुरुवात

बीड शहरातील साचलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यास सुरुवात

Next

बीड : बीड शहरात विविध भागात जमा होणारा कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. परंतु, मागील काही दिवसांपासून डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास अडचणी निर्माण झाल्याने शहरातील विविध भागात तसाच कचरा पडून होता. याबाबत नागरिकांकडून तक्रारी येऊ लागल्याने उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांनी ऑन द स्पॉट डंपिंग ग्राऊंडवर जावून हा प्रश्न सोडवला आहे.

शहरात विविध भागात साचलेला कचरा जमा करून डंपिंग ग्राऊंडवर टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, बीड नगर पालिकेचा स्वच्छता विभाग कामाला लागला आहे. बीड शहरातील विविध भागात जमा होणारा कचरा नाळवंडी नाक्याच्या पुढे डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. मागील काही दिवसांपासून टाकण्यात येणारा कचरा बंद होता. त्यामुळे शहरातील विविध भागात कचरा तसाच पडून असल्याने त्याचा नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांच्या निदर्शनास आली.

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हेमंत क्षीरसागर यांनी नाळवंडी नाक्याच्या पुढे असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर जाऊन ऑन द स्पॉट हा प्रश्न सोडवला. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासमवेत यावेळी स्वच्छता निरीक्षक चांदणे, नगरसेवक आमेर, रईस, जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर, समीर तांबोळी व नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

230821\23bed_11_23082021_14.jpg

बीड शहरातील साचलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यास सुरूवात 

Web Title: The city of Beed began dumping waste at the dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.