पंधरा वीस दिवसांपासून पाटोदा शहरास पिण्याचे पाणी नाही - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:12+5:302021-03-26T04:33:12+5:30
पाटोदा : पाटोदा शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नगर पंचायतद्वारा नळाला पाणी न सोडल्यामुळे लोक पाण्यासाठी भटकंती करत ...
पाटोदा : पाटोदा शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नगर पंचायतद्वारा नळाला पाणी न सोडल्यामुळे लोक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. काही लोक विकत पाणी घेऊन आपली तहान भागवत आहेत. मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पाटोदा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा नसता नगरपंचायतवर महिला हंडा मोर्चा काढतील, असा इशारा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा निला पोकळे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
पाटोदा शहराच्या क्रांतीनगर ,जयसिंग नगर तसेच शिवाजी नगर, माउली नगर आदी भागात गेल्या १५ ते २० दिवसांपासून नगरपंचायतद्वारा पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. लोकांना पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर भटकंती करावी लागत आहे. कारण पाटोदा शहरातील अनेक विंधन विहिरी व तसेच विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेली असून अनेक विंधन विहिरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे.
विशेष म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते लोक दोनशे रुपये तीनशे रुपये घेऊन आपली पाण्याची तहान भागवत आहेत. नगरपंचायतला अनेक वेळा लोकांनी पाणी संदर्भात विनवण्या केल्या मात्र नगरपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. यामुळे त्रस्त होऊन पाटोदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष निला पोकळे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन पाणी सोडण्याची विनंती केली आहे. एक दोन दिवसात जर पाणी सोडले नाही तर शहरातील महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.
===Photopath===
250321\25bed_3_25032021_14.jpg
===Caption===
राष्ट्रवादी महिला अध्यक्षा निला पोकळे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात निवेदन दिले.