तागडगावात विठ्ठल प्रतिमेची नगर परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:41+5:302021-07-22T04:21:41+5:30

शिरूर कासार : मंगळवारी आषाढी एकादशीचा सोहळा कोरोनाच्या कारणाने प्रत्येकाने घरच्या घरीच वा गावात साध्या पद्धतीने साजरा करून विठ्ठलाप्रती ...

City tour of the image of Vitthal in Tagadgaon | तागडगावात विठ्ठल प्रतिमेची नगर परिक्रमा

तागडगावात विठ्ठल प्रतिमेची नगर परिक्रमा

Next

शिरूर कासार : मंगळवारी आषाढी एकादशीचा सोहळा कोरोनाच्या कारणाने प्रत्येकाने घरच्या घरीच वा गावात साध्या पद्धतीने साजरा करून विठ्ठलाप्रती असलेला भाव व्यक्त केला. तागडगाव येथेही भगवान बाबा संस्थानचे महंत अतुल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल प्रतिमेसह नगर प्रदक्षिणा करून पंढरीतील आनंद घेतला. कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी शासनाने घालून दिलेले नियम हे समाज सुरक्षेसाठी असल्याने वारीचा दुराग्रह न धरता गावातच पंढरीचा आनंद घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला असून, ग्रामस्थांनी देखील प्रतिसाद दिला असल्याचे अतुल शास्त्री यांनी सांगितले.

फोटो

भानकवाडी कोरोनाच्या रेडझोनमध्ये

शिरूर कासार : तालुक्यात मंगळवारी ४२ रुग्ण होते, तर बुधवारी ही संख्या अर्ध्यावर आल्याचे अहवालात दिसून आले. मात्र, तालुक्यात २१ रुग्णांपैकी एकट्या भानकवाडीत नऊ रुग्ण निघाल्याने ही वाडी कोरोनाच्या रेड झोनमध्ये असल्याने विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे .

भुईमूग पिवळा पडू लागला, तर तिळाला रोगाची बाधा

शिरूर कासार : आठवडाभरापासून पावसाने उसंत दिली नसून, पिकांच्या दृष्टीने तरी तो आता प्रमाणाबाहेर असल्याचे चित्र शेत शिवारात फेरफटका मारल्यानंतर स्पष्टपणे दिसून येत आहे. भुईमूग पिवळा पडत असून, तिळाला रोगाची बाधा पोहोचली असल्याचे दिसत आहे. सखल भागात पाणी साचल्याने बाजरी पिकालासुद्धा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

पोटाच्या विकाराबरोबर अन्य व्याधी

शिरूर कासार : आषाढ महिना, त्यात सुरू असलेला पाऊस, त्यामुळे होत असलेली चिडचिड आणि वातावरण बदलाचा परिणाम म्हणून पोटाचे विकार व त्यासोबतच अन्य किरकोळ व्याधी सध्या त्रासदायक ठरत आहेत. अशा परिस्थितीत उघडे, शिळे, थंड वा तेलकट अन्न खाण्याचे टाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.

210721\img-20210721-wa0012.jpg

वच्छलाबाई सानप यांचे निधन

Web Title: City tour of the image of Vitthal in Tagadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.