न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा ३५ वर्षांनंतर भरला वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:05+5:302021-09-02T05:12:05+5:30

गुरुजनांचे पूजन करून, वस्त्रप्रावरणे देऊन, त्यांना फुलांच्या पायघड्यांवरून व्यासपीठावर नेले. यावेळी विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव केला. प्रार्थनेने सुरुवात झाल्यानंतर ...

A class of New High School students after 35 years | न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा ३५ वर्षांनंतर भरला वर्ग

न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा ३५ वर्षांनंतर भरला वर्ग

Next

गुरुजनांचे पूजन करून, वस्त्रप्रावरणे देऊन, त्यांना फुलांच्या पायघड्यांवरून व्यासपीठावर नेले. यावेळी विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव केला. प्रार्थनेने सुरुवात झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन मुख्याध्यापक बलभीम चव्हाण, चिंतामण राख ,वामन ईजारे, केशव ढाकणे, धनंजय देशमुख, मधुकर वांढरे, बंकट ढवारे तसेच मदनलाल, आदींचा सत्कार करण्यात आला.

या ३५ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या सत्काराने गुरुजन भारावून गेले होते. आपले विद्यार्थी आज मुख्याध्यापक शिक्षक, वीज तंत्रज्ञ, उद्योजक, वकील, डाॅक्टर, शेतकरी म्हणून त्यांच्या क्षेत्रांत उत्तम कार्य करीत असल्याचे समजल्याने गुरुजनांनी मोठा आनंद व्यक्त केला. यावेळी अनेकांनी आठवणींना उजाळा दिला. मुरलीधर गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. अर्जुन बारगजे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रकाश साबळे यांनी आभार मानले.

010921\sakharam shinde_img-20210831-wa0086_14.jpg

Web Title: A class of New High School students after 35 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.