वर्गमित्रांनी दिले ग्रामीण रुग्णालयास २५ बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:20+5:302021-05-01T04:32:20+5:30
धारूर शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील १९८४ च्या दहावीचे ७५ सदस्य आहेत. या मित्र व मैत्रिणी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम ...
धारूर शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील १९८४ च्या दहावीचे ७५ सदस्य आहेत. या मित्र व मैत्रिणी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात. यावर्षी मित्रांनी कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने ग्रामीण रुग्णालयात काही भौतिक सुविधा कमी पडत आहेत. हे लक्षात घेऊन गुरुवारी रुग्णालयाला पलंग, गादीसह असे २५ बेड्स सामाजिक हेतूने भेट म्हणून दिले आहेत.
धारुर तहसिल कार्यालयाच्या तहसिलदार वंदना शिडोळकर, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक
डॉ. चेतन आदमाने, अजयसिंह दिख्खत, प्रा.नितेंद्र शुकला, लक्ष्मण ढगे, नंदकुमार निक्ते, व्यंकटेश वेदपाठक, दिलीप सावंत, बाळूशेठ तोष्णीवाल, नागनाथ गायके, नितीन सद्दिवाल, अनंत काळे, राजू महामुनी, विपिन मिश्रा, मंगल काळे, भगवान उकंडे, प्रकाश काळे, सदानंद खिंडरे, महादेव देशमुख, प्रा.विजय शिनगारे, सुर्यकांत जगताप आदी उपस्थित होते.
===Photopath===
300421\anil mhajan_img-20210430-wa0088_14.jpg