स्वच्छता अभियानाचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:47+5:302021-09-02T05:11:47+5:30
-------------------------- लाभार्थी वेतनाच्या प्रतीक्षेत अंबाजोगाई : तालुक्यातील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी मानधनापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी ...
--------------------------
लाभार्थी वेतनाच्या प्रतीक्षेत
अंबाजोगाई : तालुक्यातील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी मानधनापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. काहींची संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेसाठी निवड करण्यात आली. मात्र त्यांच्या खात्यात पैसेच जमा होत नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
---------
गावात स्वच्छता मोहीम राबवावी
अंबाजोगाई : शहरात काही ठिकाणाहून कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नाही. अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
------
जलस्रोताची तपासणी करण्याची माणगी
अंबाजोगाई : पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने दूषित पाण्यामुळे विविध रोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील जलस्रोताची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा, पोटदुखी असे विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे विहीर, बोरवेल, हातपंप, नळ आदी जलस्रोताची तपासणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
--------
शाळेची धुरा आता स्थानिक समितीवर
अंबाजोगाई : शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असला तरी या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक समितीवर सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर समिती गठित करून शासनाकडून सुचविण्यात आलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा करूनच शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.