प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:36 AM2019-09-25T00:36:09+5:302019-09-25T00:36:31+5:30
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व प्रशासकीय कार्यालये स्वच्छ करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची ओळख स्वच्छताप्रिय अधिकारी अशी आहे. मात्र,बीड जिल्ह्यातील अनेक कार्यालये हे अस्वच्छ अशा स्थितीमध्ये होते. दरम्यान मंगळवारपासून जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रशासकीय कार्यालये स्वच्छ करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानूसार मंगळवारपासून स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली आहे.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी सकाळी बीड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला भेट दिली. यावेळी त्यांना त्याठिकाणी अस्वच्छेते साम्राज्य पाहायला मिळाले, त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून कार्यालय स्वछ करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचा-यांनी हातात झाडू घेऊन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची स्वच्छता मोहीम सुरु केली. यावेळी सर्व कार्यालयात व विभागांमध्ये झाडू हातात घेऊन धूळ झटकली. तब्बल २० वर्षानंतर अशा प्रकारे या कार्यालयाची स्वच्छता होत असल्याचे काही कर्मचा-यांनी सांगितले.
तहसील व इतर अनेक कार्यालयांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण अधिक आहे. शासकीय इमारतीमध्ये येणारे भिंतीवर थंकतात, कचरा, फळांचे आवरण परिसरात टाकतात. त्याठिकाणी असलेल्या स्वच्छता कर्मचा-यांचे देखील त्याक डे अनेक वेळा दुर्लक्ष होते. प्रत्येक कार्यालयात स्वच्छेतेसाठी कर्मचारी नेमलेले आहेत. मात्र, त्यांच्याकडून हे काम चखपणे बजावले जात नसल्यामुळे कार्यालयांची दुरावस्था झालेली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मध्यवर्ती कार्यालयात भेट दिल्यानंतर सर्व कार्यालय स्वच्छ झाडून व धुवून घेण्याच्या सुचना केल्या. तसेच रंगरोगटी करण्याचे देखील आदेश त्यांनी यावेळी दिले. कार्यालयात व्यक्ती आल्यानंतर त्याला प्रसन्न वाटावे असा यामागचा उद्देश आहे. ही मोहीम जिल्ह्यातील सर्व कार्यालर्यांमध्ये राबवण्याचे देखील आदेश पाण्डेय यांनी दिले आहेत. तसेच नागरिक ांनी देखील स्वच्छतेच्या संदर्भात सजग राहून कार्यालयात आल्यावर अस्वच्छा व भिंतीवर थुंकणे बंद बंद करणे गरजेचे आहे,असे मत संबंधित कार्यालयातील कर्मचा-यांनी व्यक्त केले. बीड मध्यवर्ती इमारतीमध्ये पाण्डेय यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी नामेदव टिळेकर, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.
टापटिपीचे जिल्हाधिका-यांनी दिले धडे
बीड येथील प्रशासकीय इमातीला भेट दिली त्यावेळी अस्ताव्यस्तपणे पडलेले जुने दस्ताऐवज जिल्हाधिकारी यांना दिसून आले. त्यावेळी संबंधित विभागीतील अधिका-यांनी हे सर्व स्वच्छता करावी व सर्व दस्ताऐवज व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना यावेळी अधिकारी कर्मचा-यांना दिल्या
नागरिकांनी देखील स्वच्छतेचे नियम पाळावेत
प्रशासकीय कार्यालय हे शासनाचे म्हणजेच सामान्य नागरिकांचेच आहेत. त्यामुळे त्यांनी देखील स्वच्छतेचे महत्त्व जाणून कार्यालयात आल्यावर अवस्छता करणे टाळावे. यापुढे अस्वच्छता करताना आढळ््यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.