लोकसहभागातून मंदिर परिसराची स्वच्छता, वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:33+5:302021-05-17T04:32:33+5:30
गेवराई : तालुक्यातील सिरसमार्ग येथील शनी महाराज मंदिराचा परिसर गावातील तरुणांनी व नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छ करून व लोकसहभागातून ...
गेवराई : तालुक्यातील सिरसमार्ग येथील शनी महाराज मंदिराचा परिसर गावातील तरुणांनी व नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छ करून व लोकसहभागातून लोखंडी जाळीचे संरक्षण करण्यात आले. तसेच या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
सिंदफना, विद्रुपा, डोमरी नदीच्या संगमावर असलेल्या सिरसमार्ग येथील शनी मंदिरात गेल्या काही वर्षांपासून घाणीचे साम्राज्य पसरले होते. येथे बाभळ व गवताचा विळखा पडला होता. त्यामुळे सर्वत्र घाणच घाण झाली होती. त्यामुळे गावातील तरुणांनी मंदिर परिसरात साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. तसेच लोकसहभागातून ७० हजार रुपये जमा करून लोखंडी जाळ्याचे संरक्षण (कंपाऊड) करून शनी मूर्तीखालील ओटा बांधकाम करण्यात आले. तसेच येथे नदीकाठी व मंदिर परिसरात सायंकाळी नागरिकांना बसायला सिमेंटचे बाकडे टाकण्यात आले. तसेच येथील परिसर हिरवागार करण्यासाठी मदत म्हणून गेवराई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे याच्या वतीने शनी मंदिर परिसरात नारळाच्या दहा झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस रंजित पवार, सखाराम शिंदे, राजेश टाक, अभिजित ठाकूर, दिनेश गुळवे, रामकिसन मदने, संतोष रडे, बाला परदेशी, शिवाजी परदेशी, अशोक टाकसाळ, भगवान डुकरे, अविनाश मगर, शिवाजी लंबे, सखाराम थोरात, नागेश रडे, उपसरपंच अशोक परदेशीसह अनेकजण उपस्थित होते.
( सोबतचे फोटो शनी मूर्ती, वृक्षारोपण, स्वच्छ परिसरात )
===Photopath===
160521\sakharam shinde_img-20210516-wa0052_14.jpg~160521\20210511_180933_14.jpg