स्वच्छता राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:29 AM2021-02-05T08:29:38+5:302021-02-05T08:29:38+5:30
वन्यप्राण्यांचा उपद्रव अंबाजोगाई : तालुक्यात डोंगराळ भागात हरीण, रानडुक्कर, लांडगा या वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रामुख्याने रानडुकरांची ...
वन्यप्राण्यांचा उपद्रव
अंबाजोगाई : तालुक्यात डोंगराळ भागात हरीण, रानडुक्कर, लांडगा या वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रामुख्याने रानडुकरांची संख्या वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे. वन खात्याकडे वारंवार तक्रारी केल्या तरी लक्ष दिले जात नाही.
बसस्थानकात गर्दी
अंबाजोगाई : बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही वाढला आहे. बसस्थानकात गावी जाण्यासाठी गर्दी होत आहे. तरीही सामाजिक अंतर, मास्कचा वापर याबाबत कसलीही दक्षता दिसून येत नाही. यामुळे धोका वाढत आहे.
भाजीपाल्याच्या दरात झाली घसरण
अंबाजोगाई : येथील बाजारपेठेत गेल्या दोन आठवड्यांपासून भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरातून पत्ता कोबी, फूलकोबी, वांगी, टोमॅटो, पालक, मेथी, सिमला मिरची, लिंबू, कोथिंबीर अशा विविध भाज्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत. आवक वाढल्याने दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. यामुळे भाज्यांचे भावही घसरल्याने सामान्य नागरिकांना हायसे वाटू लागले आहे.
वाहनतळाचा अभाव
अंबाजोगाई : शहरातील भाजीमंडईमध्ये वाहनतळाचा अभाव आहे. मंडई बाजार व भाजीमंडई परिसर ग्राहकांमुळे सतत गजबजलेला असतो. अरुंद रस्ते व वाहनतळाचा अभाव यामुळे या परिसरात सतत वाहतुकीची कोंडी होते. यामुळे भाजी मंडई परिसरात वाहनतळाची मागणी नागरिकांतून होत आहे.