७० हजारांची लाच घेताना सहकारी संस्थेचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात
By सोमनाथ खताळ | Published: August 24, 2023 08:17 PM2023-08-24T20:17:34+5:302023-08-24T20:51:02+5:30
ही कारवाई गेवराई पंचायत समितीच्या आवारात गुरूवारी सायंकाळी करण्यात आली.
बीड : गेवराई तालुक्यातील एका संस्थेची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय गेवराई येथे नोंद करण्यासाठी राजाभाऊ शिंदे या लिपीकाने ७५ हजार रूपयांची लाच मागितली होती. यातील ७० हजार रूपये घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई गेवराई पंचायत समितीच्या आवारात गुरूवारी सायंकाळी करण्यात आली. त्याच्याविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युनूस शेख, भारत गारदे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे, रेखा मळेकर यांनी केली.