संवेदनशील मतदार संघांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 23:56 IST2019-10-23T23:55:54+5:302019-10-23T23:56:35+5:30
जिल्ह्यात सर्वच मतदारसंघाची मतमोजणी आज होत आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील असलेल्या मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

संवेदनशील मतदार संघांवर करडी नजर
बीड : जिल्ह्यात सर्वच मतदारसंघाची मतमोजणी आज होत आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील असलेल्या मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
बीडमधील सर्व सहाही मतदारसंघाच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज मतमोजणी होत असून, यावेळी कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहवी यासाठी पोलीस प्रशानाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्ट्रँग रूम परिसर शहरातील मुख्य चौक व रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच फिरते पथक देखील सर्वत्र पाहणी करणार आहेत. सहाही मतदारसंघात अतितटीची लढत आहे. त्यामुळे मतमोजणीच्या वेळी व विजय घोषीत झाल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर व पोलीस उपाधीक्षक हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असणार आहेत. तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी, आरसीपीचे जवान, होमगार्ड मोठ्या संख्येने तैनात असणार आहेत.
तरूणांनी अतिउत्साहीपणा दाखवू नये
मतमोजणी कार्यकाळात किंवा विजय घोषित झाल्यानंतर तरुणांनी अतिउत्साहीपणा दाखवू नये, कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षण तसेच शासकीय नोकरी मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही प्रकाच्या गोंधळात तरूणांनी सहभागी होऊ नये, तसेच अशा प्रकार कुठे होत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा , असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.