कपिलेश्वर मंदिरातील नामजप सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:46+5:302021-08-24T04:37:46+5:30
.... कापशीला लाल्या रोगाने ग्रासले शिरूर कासार : सुरुवातीपासून कापसाचे पीक जोमदार होते. मात्र, या आठवड्यात पाऊस पडून देखील ...
....
कापशीला लाल्या रोगाने ग्रासले
शिरूर कासार : सुरुवातीपासून कापसाचे पीक जोमदार होते. मात्र, या आठवड्यात पाऊस पडून देखील कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. यामुळे ऐन फुलात आलेल्या कापसाचा जोम बिघडला असल्याने शेतकरी चिंतित आहेत. तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. आता कपाशी लाल्याच्या वेढ्यात सापडली आहे.
...
चिंचेच्या झाडांना चिंचांचे घोस लगडले
शिरूर कासार : यावर्षी चिंचेच्या झाडांना कोवळ्या चिंचांचे घोस लागले असल्याचे दिसून येत आहे. चिंचेला बहर आला तर ज्वारीचे पीक चांगले येते, असा जुन्या जाणकार शेतकऱ्यांचा अंदाज असतो. चिंचेच्या झाडाकडे पहिल्यानंतर नक्कीच ज्वारी पीक चांगले येणार, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.
....
शिरूर कासार तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर
शिरूर कासार : तालुक्यातील कोरोना आकडा खाली खाली येत सोमवारी दोनवर आला आहे. आता तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आला असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार पाडळी, आनंदगाव या दोन गावांत फक्त एक, एक बाधित रुग्ण निघाल्याने तालुका लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. असे असले तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये. आणखी नियमावलीतच राहणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
230821\img20210821170752.jpg
फोटो