ढगाळ वातावरणाचा पिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:03+5:302021-05-06T04:36:03+5:30
बीड : आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. सध्या उन्हाळी बाजरी ...
बीड : आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. सध्या उन्हाळी बाजरी व इतर पिके जोमात आहेत, तसेच इतर फळबागा व भाजीपालाही शेतात आहे. या वातावरणाचा आंब्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी आंब्याचे नुकसान झालेले आहे.
शिरूर कासारमध्ये चोऱ्या वाढल्या
बीड : गेल्या काही दिवसांपासून शिरूर कासार शहर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्या वाढल्याने नागरिकांत घबराट असून, रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.पोलिसांनी चोऱ्यांना आळा घालून गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
कोंडवाडा दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा सुभाष रोडलगत कोंडवाडा आहे, परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरुस्त करून मोकाट गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी होत आहे.