मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा बांध विसरले; त्यांची अवस्था गझनीतील आमीर खान सारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 06:03 PM2020-10-14T18:03:00+5:302020-10-14T18:13:05+5:30

किसान संवाद यात्रेत माजीमंञी तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांची टीका

CM forgot farmers field; His condition is similar to that of Aamir Khan in Ghazani | मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा बांध विसरले; त्यांची अवस्था गझनीतील आमीर खान सारखी

मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा बांध विसरले; त्यांची अवस्था गझनीतील आमीर खान सारखी

Next
ठळक मुद्देनवीन शेती कायदा हा शेतक-यांना स्वातंत्र्य देणारा सरकार शेतक-यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहे

आष्टी :  मध्यस्थाशिवाय शेतात पिकविलेला माल शेतकरी स्वतः  बाजारपेठेत जाऊन विकू शकतो असा हिताचा कायदाच राज्य सरकारला कळत नाही. मुख्यमंत्री नसताना बांधावर जाऊन शेतकऱ्यांबद्दल कळवळा असल्याचे दाखवणारे उद्धव ठाकरे आता सर्व विसरले आहेत. त्यांची अवस्था मागचे काहीच आठवत नसलेल्या गझनीतील आमीर खान सारखी झाली असल्याची टोकदार टीका माजीमंञी तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केली आहे. ते तालुक्यातील वटनवाडी येथील किसान संवाद यात्रेत बोलत होते. 

पुढे बोलताना बोंडे म्हणाले की, नवीन शेती कायदा हा शेतक-यांना स्वातंत्र्य देणारा कायदा असून त्या कायद्याची अंमलबजावणी हे राज्य सरकार करत नाही याचा अर्थ हे सरकार शेतक-यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा हा प्रकार असल्याचेही बोंडे यावेळी म्हणाले. तसेच आ. सुरेश धस यांनी नवीन शेती कायद्यामुळे राज्यातील काही विशिष्ट पक्षातील लोकांची दुकानदारी बंद होणार आहे. यामुळे राज्य सरकार हा कायदा लागू करत नाही अशी टीका केली. 

याप्रसंगी रमेश पोकळे, हिरालाल बलदोटा यांनी मनोगत व्यक्त केले. रमजान तांबोळी, हिरालाल बलदोटा, दत्ताञय जेवे, अनिल ढोबळे, रंगनाथ धोंडे, खंडू जाधव, राजेंद्र शिंदे, गणेश शिंदे, माऊली जरांगे, भगवान शिनगिरे, संदिप खाकाळ, अजित घुले, पप्पू खाकाळ, राम धुमाळ, नवनाथ साबळे, काका थेटे, ऋषी खिळे, राजू शिंदे, भगवान शिनगिरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: CM forgot farmers field; His condition is similar to that of Aamir Khan in Ghazani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.