बीड शहरात कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:40 PM2019-05-08T23:40:40+5:302019-05-08T23:41:50+5:30

कॉफी पिण्याच्या नावाखाली कॉफी शॉपमध्ये बसून आंबटचाळे करणाऱ्या युगुलाचा अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पर्दाफाश केला.

Coconut shell in Beed city | बीड शहरात कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे

बीड शहरात कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे

Next
ठळक मुद्देअपर पोलीस अधीक्षकांचे दोन तास स्टिंग : अर्धनग्न अवस्थेतील युगुल ताब्यात

सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कॉफी पिण्याच्या नावाखाली कॉफी शॉपमध्ये बसून आंबटचाळे करणाऱ्या युगुलाचा अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पर्दाफाश केला. तसेच कॉफीशॉपवाल्यांची ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर आणली. अर्धनग्न अवस्थेतील एका युगुलाला रंगेहाथ पकडले. बुधवारी रात्री ७ ते ९ दरम्यान असे दोन तास कबाडे यांनी बीड शहरात फिरून स्टिंग केले.
शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी तरुण धुम्रपान, मद्यपानासारखी व्यसने करतात. याचा त्रास ये-जा करणाऱ्यांसह परिसरातील व्यापारपेठेला होतो. तसेच शाळा, महाविद्यालय, शिकवण्यांच्याजवळ कॉफी शॉप उघडले आहेत. कॉफी पिण्याच्या नावाखाली युगुलांसाठी हा जणू ‘अड्डा’च ठरत आहे. हाच धागा पकडून बुधवारी रात्री ७ वाजता विजय कबाडे यांनी स्वत: दुचाकीवरुन शहरात फेरफटका मारला. आधी सिध्दीविनायक कॉम्प्लेक्समध्ये कॉफीबरोबर सिगारेटचा झुरका ओढणाºयांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अडगळीच्या ठिकाणी असलेल्या कॉफीशॉपकडे वळवला.
शाहूनगर भागातील दहावी, बारावीच्या शिकवणीसह एक महाविद्यालय असलेल्या अपार्टमेंटच्या तळमजल्यातील एका कॉफीशॉपवर अचानक धाड टाकली. यावेळी एक युगुल पडद्याआड अर्धनग्न अवस्थेत दिसून आले. या दोघांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्याकडे देण्यात आले. ही कारवाई विजय कबाडे यांच्यासह विशेष पथकाचे प्रमुख रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, रेवणनाथ दुधाणे, जयदीप सोनवणे, काकडे, गणेश नवले, हनुमान राठोड, अंकुश वरपे, सूरज काकडे आदींनी केली.
पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष
शाळा, महाविद्यालयासह शिकवणीच्या नावाखाली आपले पाल्य तासन्तास घराबाहेर असते. खरोखरच ते शिक्षणासाठी जातात काय ? याची पालकांनी तपासणी करणे गरजेचे आहे. सर्वच मुले वाईट नाहीत. मात्र, मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. गैरकृत्य टाळण्यासाठी मुलांशी वारंवार संवाद साधून त्यांचे ‘लोकेशन’ वेळोवेळी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांना पॉकेटमनी किती द्यायचा ? पॉकेटमनी कशासाठी वापरतात याचाही विचार करण्याची गरज आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
कॉफीशॉपमध्ये दिवसभर अनेक युगुल बसून आंबटचाळे करीत असल्याचे चौकशीतून समोर आले. हाच धागा पकडून याच कॉफीशॉपमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. शॉपचालक राज संजीवन शिंदे याला ताब्यात घेतले आहे.
फुटेजवरुन ‘ब्लॅकमेलिंग’ ?
कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे करताना दुकानमालक सीसीटीव्ही फुटेजवरुन युगुलांना ब्लॅकमेल करण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. कसलीही काळजी न घेता युगुल असे कृत्य करीत असल्याने धोक्याची घंटा नाकारता येत नाही.

Web Title: Coconut shell in Beed city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.