रुग्णवाहिकेसाठी आ. धस यांनी दिले ४० लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:42+5:302021-04-18T04:32:42+5:30

बीड : कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन भाजपचे आ. सुरेश धस यांनी ...

Come for the ambulance. Dhas gave Rs 40 lakh | रुग्णवाहिकेसाठी आ. धस यांनी दिले ४० लाख रुपये

रुग्णवाहिकेसाठी आ. धस यांनी दिले ४० लाख रुपये

Next

बीड : कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन भाजपचे आ. सुरेश धस यांनी दोन रुग्णवाहिकांसाठी ‘स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२१-२२' अंतर्गत ४० लाख रुपयांच्या निधीचे पत्र जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे दिले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असून रोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून, आता सर्वांनी पुढे येऊन कोरोनाला हरविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांच्या प्रवासासाठी रुग्णवाहिकांची कमतरता भासत होती. ही गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य ॲड. प्रकाश कवठेकर यांनी पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिकेची मागणी आमदार सुरेश धस यांच्याकडे केली होती. तर आष्टीतदेखील रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज असल्याचे समोर येत होते. रुग्णालयात वेळेवर उपचार होण्याबरोबरच रुग्णांना घरापासून रुग्णालयात नेण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची गरज होती. स्थानिक विकास कार्यक्रम योजनेमधून आष्टी, पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी प्रती एक रुग्णवाहिका देण्यासाठी ४० लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, असे पत्र जिल्हा नियोजन अधिकारी यांना शुक्रवारी दिले आहे. या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर कोरोना रुग्णांची सोय होणार आहे. त्यामुळे या विधायक कामाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

Web Title: Come for the ambulance. Dhas gave Rs 40 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.