कोरोना चाचणीसाठी पुढे या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:46+5:302021-07-28T04:34:46+5:30
अंबाजोगाई : वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजारांनी बेजार करून सोडले आहे. विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. ...
अंबाजोगाई : वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजारांनी बेजार करून सोडले आहे. विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. कोरोनाची लक्षणे व सर्दीमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी चाचणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे यांनी केले आहे.
----
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
अंबाजोगाई : कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत करण्याची मागणी अंबाजोगाई व परिसरातील बांधकाम कामगारांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकामे बंद झाली होती. परिणामी, बांधकाम कामगारांना रोजगार मिळेनासा झाला.
-----
बेरोजगारांच्या हाताला काम द्या
अंबाजोगाई : तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी शासनाने उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, छोट्या- मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात उत्पादित धान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग नसल्याने युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारांना काम मिळवून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. बिभीषण चाटे यांनी केली आहे.
---
रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ
अंबाजोगाई : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. रासायनिक भाज्यांमुळे आजारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
------
वाहतूक कोंडीवर उपाययोजनेची मागणी
अंबाजोगाई : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कायम कोंडी असते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने शहरातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग पार करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.