दिलासा! जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या घटतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:32 AM2021-05-16T04:32:44+5:302021-05-16T04:32:44+5:30
बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात संशयित व बाधित रुग्णांची दाखल ...
बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात संशयित व बाधित रुग्णांची दाखल होण्याची संख्याही कमी झाल्याचे समोर आले आहे. मागील आठवडाभरात १४९ वरून संख्या ७७ वर आली आहे. ८२९ रुग्णांना ॲडमिट केले आहे.
जिल्ह्यात मागील महिन्यासह आठवड्यापूर्वी कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली होती. जिल्हा रुग्णालयात खाटा मिळणेही मुश्कील बनले होते. परंतु आठवड्यापासून जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याचे दिसत आहे. ७ मे रोजी दाखल झालेल्यांची संख्या १४९ एवढी होती. ती आता घटून शुक्रवारी ७७ वर आली होती. ही बाब सर्वांना दिलासा देणारी आहे. शनिवारी आढावा घेतला असता, जिल्हा रुग्णालयातील अपवादात्मक वगळता काही वॉर्डमध्ये खाटाही रिकाम्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
...
मागील आठवड्यापासून कोरोनाबाधित व संशयित रुग्णांची संख्या कमी झाली असून, ही दिलासा देणारी बाब आहे. असे असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. खाटा राखीव ठेवण्यासह औषधोपचार व सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
आठवडाभरातील दाखल रुग्णसंख्या
७ मे - १४९
८ मे - १३३
९ मे - ९८
१० मे - ९८
११ मे - ९१
१२ मे - ९६
१३ मे - ८७
१४ मे - ७७