न्युमोनियापासून रोखण्यासाठी शिरूरमध्ये लसीकरणाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:13+5:302021-07-17T04:26:13+5:30

शिरूर कासार : न्युमोनियापासून लहान मुलांचे संरक्षण होण्यासाठी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने न्युमोकोकल कॅज्युगेट व्हॅक्सिनच्या लसीकरणाचा प्रारंभ तालुक्यातील दगडवाडी ...

Commencement of vaccination in Shirur to prevent pneumonia | न्युमोनियापासून रोखण्यासाठी शिरूरमध्ये लसीकरणाचा प्रारंभ

न्युमोनियापासून रोखण्यासाठी शिरूरमध्ये लसीकरणाचा प्रारंभ

Next

शिरूर कासार : न्युमोनियापासून लहान मुलांचे संरक्षण होण्यासाठी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने न्युमोकोकल कॅज्युगेट व्हॅक्सिनच्या लसीकरणाचा प्रारंभ तालुक्यातील दगडवाडी येथून करण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक नारायण सानप आणि ए. एन. एम. सपना शेख यांच्या हस्ते बालकांचे लसीकरण करण्यात आले.

राज्यातील पाच वर्षांच्या आतील मुलांना न्यूमोकोकल अर्थात संभाव्य न्युमोनिया आजारापासून सुरक्षित ठेवण्याकरिता न्युमोकोकल कॅज्युगेट व्हॅक्सिन या लसीचा नियमित लसीकरणात समावेश करण्यात आला आहे. न्युमोकोकल कॅज्युगेट व्हॅक्सिन पाच वर्षांच्या आतील बालकांना देण्यासाठी सुरुवात झाली आहे. नागरिकांनी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता बालकांचे लसीकरण करून घ्यावे.

-------

न्युमोकोकल न्युमोनिया हा श्वसन मार्गातील एक संसर्ग आहे. खोकला येणे, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, धाप लागणे, ही या आजाराची लक्षणे आहेत. हा आजार झाल्यावर फुफ्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे. -डॉ. अशोक गवळी, तालुका आरोग्य अधिकारी, शिरूर.

-----

तीन टप्प्यात लसीकरण

तालुक्यातील बालकांना ही लस देण्यासाठी सुरुवात झाली असून, बालकांचे तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. सुरुवातीचा डोस सहा आठवड्यानंतर, दुसरा डोस १४ आठवड्यानंतर आणि तिसरा महत्त्वाचा असणारा बुस्टर डोस बाळ नऊ महिन्यांचे झाल्यानंतर देण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

-------

न्युमोनियाच्या उच्चाटनासाठी लस

सदरील डोस ज्या बाळांना ऍलर्जी असेल किंवा एखाद्या गंभीर आजाराने बाळ आजारी असेल अशा बालकांना देऊ नये, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. पाच वर्षांच्या आतील मुलांमध्ये न्युमोनियाची लक्षणे आढळून येत असल्यामुळे या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हा डोस देण्यात येत आहे.

150721\3636img-20210715-wa0028.jpg

फोटो

Web Title: Commencement of vaccination in Shirur to prevent pneumonia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.