व्यावसायिक सिलिंडरही महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:34+5:302021-09-06T04:37:34+5:30
दि. १८ ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली हाेती. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तीन रुपये ...
दि. १८ ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली हाेती. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तीन रुपये कमी झाले होते. मात्र व्यावसायिक सिलिंडरचे दरही हळूहळू वाढतच आहेत. त्यामुळे व्यवसायासाठी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत असून त्याचा परिणाम त्यांच्याकडील विक्रीसाठी असलेल्या पदार्थांच्या किमतीवर होत असून सामान्य ग्राहकालाच याची झळ बसत आहे.
महिन्याचे गणित कोलमडले
धूर प्रदूषण टाळण्यासाठी रॉकेल आणि चुलींचा वापर बंद करून सर्वच घटकातील कुटुंबे स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात. आता फ्लॅट संस्कृती वाढली आहे. अशा परिस्थितीत आठ - पंधरा दिवसाला २५ ते ५० रुपयांनी वाढणारे गॅसचे भाव पाहता, पुन्हा चूल पेटविण्याची वेळ आली आहे. सामान्यांनी जगायचे कसे ?
- छाया दिनेश राठौर, गृहिणी, बीड.
-----------
कोरोना काळात लॉकडाऊनचा फटका बसल्याने अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. डाळी, तेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता तर गॅससाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सरकारने महागाई नियंत्रणात आणावी.
- रेणुका गणेश राऊत, गृहिणी, बीड.
-------