बीडमध्ये ९३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:10 AM2019-12-30T00:10:00+5:302019-12-30T00:10:41+5:30

इज्तेमाई शादीयां कमिटीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील ९३ गरीब आणि अनाथ मुला-मुलींचा सामुदायिक निकाह सोहळा रविवारी पर पडला. सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींचा या आयोजनात मोलाचा सहभाग होता.

A community marriage of 19 couples in Beed | बीडमध्ये ९३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

बीडमध्ये ९३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

Next
ठळक मुद्देइज्तेमाई शादीयाँ कमिटीचा पुढाकार : दानशूर व्यक्तींचा सहभाग; मान्यवरांची उपस्थिती; सर्वसामान्यांना मिळाला दिलासा

बीड : इज्तेमाई शादीयां कमिटीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील ९३ गरीब आणि अनाथ मुला-मुलींचा सामुदायिक निकाह सोहळा रविवारी पर पडला. सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींचा या आयोजनात मोलाचा सहभाग होता.
मोमीनपुरा बायपास इज्तेमागाह मैदानावर झालेल्या या सोहळ्यात आ. संदीप क्षीरसागर, आ. विनायक मेटे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, सिराज देशमुख, सुनील धांडे, हेमंत क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती.
मागील दोन वर्षात बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होती. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम झाला होता. याचा फटका सर्वसामान्य कामगार व छोट्या व्यवसायिकांनाही बसला होता. यासह इतर काही कारणांमुळे अनेक मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करणे वाढत्या महागाईमध्ये अनेकांना शक्य होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन इज्तेमाई शादीयां कमेटी स्थापन झाली.
दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी निधी जमा करून सामुदायिक विवाहाची संकल्पना मांडली. मुस्लिम समाजाच्या वतीने या संकल्पनेचे स्वागत करण्यात आले. या लग्न समारंभात ९३ जोडप्यांचा विवाह पार पडला.
यावेळी कमिटीचे मौलाना अब्दुल बारी, हाजी जमील, मैनोद्दीन, हाजी सलीम यांच्यासह समाजबांधव व नागरिकांनी विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवला होता. यावेळी उपस्थितांनी विवाह सोहळ््याचे नियोजन पाहून आयोजकांचे कौतुक करीत आभार देखील मानले.
नवदाम्पत्यांना भेट
या सामूहिक विवाह सोहळ्याचे सुंदर आयोजन करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यामुळे दुष्काळामुळे त्रस्त अनेक सर्वसामान्य कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
या विवाह सोहळ््यात सहभागी झालेल्या नवदाम्पत्यांना संसारोपयोगी वस्तूंची भेट यावेळी कमिटीच्या वतीने देण्यात आली.

Web Title: A community marriage of 19 couples in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.