अवकाळीने नुकसान झालेल्या शेती पिकांना भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:47+5:302021-03-26T04:33:47+5:30

शाह यांनी निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात अतीवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी देखील ...

Compensate for prematurely damaged agricultural crops | अवकाळीने नुकसान झालेल्या शेती पिकांना भरपाई द्या

अवकाळीने नुकसान झालेल्या शेती पिकांना भरपाई द्या

Next

शाह यांनी निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात अतीवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी देखील खरीप हंगामात अतिवृष्टी तसेच बोगस बियाणांमुळे दुबार-तिबार पेरणी करावी लागली. त्यातच गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी रब्बीतील पिके चांगली असल्याने याच पिकांकडून शेतकऱ्यांना आशा होती. गहू, हरबरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह इतर पिके ऐन काढणीला आलेली असताना जिल्हयात २२ व २३ मार्च रोजी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकरी पूर्णपणे हतबल होऊन आत्महत्येचा मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. या कठीण परिस्थितीत शेतकºयांना आधार देण्यासाठी तातडीने नुकसानाचे पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जे.डी. शाह यांनी केली आहे.

Web Title: Compensate for prematurely damaged agricultural crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.