‘स्वच्छता अॅप’मधून तक्रारींचे निरसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:51 AM2017-12-20T00:51:34+5:302017-12-20T00:51:37+5:30
बीड शहरातील घाण, मृत प्राणी, कचरा आदींच्या तक्रारी आता आपल्याला मोबाईलद्वारे करता येणार आहेत. पालिकेने नागरिकांसाठी ‘स्वच्छता अॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या अॅपच्या माध्यमातून आलेल्या जवळपास ९० टक्के तक्रारींचे निरसन झाले आहे. हे अॅप जास्तीत जास्त नागरिकांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन बीड नगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील घाण, मृत प्राणी, कचरा आदींच्या तक्रारी आता आपल्याला मोबाईलद्वारे करता येणार आहेत. पालिकेने नागरिकांसाठी ‘स्वच्छता अॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या अॅपच्या माध्यमातून आलेल्या जवळपास ९० टक्के तक्रारींचे निरसन झाले आहे. हे अॅप जास्तीत जास्त नागरिकांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन बीड नगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
स्वच्छता महाराष्ट्र अभियान अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०१८’ राबविण्यात येत आहे. या अभियानात बीडसह ४०१४ शहरांनी सहभाग नोंदविला आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी पालिका सरसावली आहे. बैठकांच्या माध्यमातून नियोजन केले जात आहे. तसेच नागरिकांना आपल्या परिसरातील स्वच्छेतेसंदर्भातील तक्रारी मोबाईलद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी अॅड्रॉईड मोबाईलमध्ये ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोड करणे आवश्यक आहे. सध्या जवळपास ७०० नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. याच्या माध्यमातून त्यांनी तक्रारी दिल्या असून ९० टक्के तक्रारींचे निरसण झाल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके यांनी सांगितले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागातील अभियंता गौरव दुधे, श्रद्धा गर्जे, शहर समन्वयक वसीम पठाण, स्वच्छता निरीक्षक आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, सुनील काळकुटे, भारत चांदणे, ज्योती ढाका आदी परिश्रम घेत आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर करा
बीड न.प.ने नागरिकांसाठी ‘स्वच्छता अॅप’ उपलब्ध करुन दिले असून, हे अॅप जास्तीत जास्त नागरिकांनी डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.