बीड जिल्ह्यात मनरेगा, जलयुक्त शिवार योजनेतील कामे पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:36 PM2019-05-07T23:36:31+5:302019-05-07T23:37:55+5:30

जिल्ह्यातील मनरेगाच्या माध्यमातून सेल्फवरील व सुरू असलेली कामे, त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेतील मंजूर कामे व अपूर्ण असलेली कामे तात्काळ हाती घेऊन ती कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Complete the activities of MNREGA, Jalakit Shivar Yojana in Beed district | बीड जिल्ह्यात मनरेगा, जलयुक्त शिवार योजनेतील कामे पूर्ण करा

बीड जिल्ह्यात मनरेगा, जलयुक्त शिवार योजनेतील कामे पूर्ण करा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी पाण्डेय : पाणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील मनरेगाच्या माध्यमातून सेल्फवरील व सुरू असलेली कामे, त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेतील मंजूर कामे व अपूर्ण असलेली कामे तात्काळ हाती घेऊन ती कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पाणी फाऊंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक नामदेव ननावरे, मराठवाडा विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, जिल्हा समन्वयक बिभीषण भोयटे, राहुल गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाºयांची भेट घेतली, त्यावेळी पदाधिकाºयांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, मनरेगाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे हाती घेऊन ती पूर्ण करावीत. जलयुक्त शिवार योजनेची मंजूर व अपूर्ण असलेली कामे २२ मेपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शासनाच्या विविध विभागांनी गावे दत्तक घ्यावीत, असेही आवाहन जिल्हाधिकाºयांनी उपस्थितांना केले.
समाधान : सर्वांचे चांगले सहकार्य
पाणी फाऊंडेशनमध्ये सहभाग घेतलेल्या गावातील ग्रामस्थांच्या चांगल्या सहकार्यामुळे तेथे जलसंधारणाची चांगली कामे झाली आहेत.
पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाºया गावांना डिझेलवरील खर्च भागविण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभाग घेतलेल्या गावांतील पाणी फाऊंडेशनच्या कामामध्ये गावकºयांनी आपले योगदान देऊन श्रमदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केले.

Web Title: Complete the activities of MNREGA, Jalakit Shivar Yojana in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.