अमृत अटल योजनेच्या नवीन पाईपलाईनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:30 AM2021-03-25T04:30:58+5:302021-03-25T04:30:58+5:30

बीड नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत दिले निर्देश बीड :- शहरासाठी माजलगाव बॅक वॉटर येथून पाणीपुरवठा होतो. या बॅक वॉटरमधून ...

Complete the remaining work of Amrut Atal Yojana's new pipeline as soon as possible | अमृत अटल योजनेच्या नवीन पाईपलाईनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करा

अमृत अटल योजनेच्या नवीन पाईपलाईनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करा

Next

बीड नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत दिले निर्देश

बीड :- शहरासाठी माजलगाव बॅक वॉटर येथून पाणीपुरवठा होतो. या बॅक वॉटरमधून अमृत अटल योजनेच्या माध्यमातून नवीन पाईप लाईनचे काम सुरू आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी काडीवडगाव येथील माजलगाव बॅक वॉटर येथे जाऊन अमृत अटल योजने संदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

माजलगाव बॅक वॉटर येथून अमृत अटल या नवीन योजनेचे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आढावा घेऊन प्रत्यक्ष शिल्लक राहिलेल्या कामांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता चक्के, उपकार्यकारी अभियंता मडावी, उपविभागीय अभियंता जोगदंड, शाखा अभियंता एम.एस. वाघ व पी.जी. गिरी यांच्या समवेत आढावा बैठक घेऊन योग्य त्या सूचना केल्या व शिल्लक राहिलेले योजनेचे काम तत्काळपूर्ण करणेबाबत व बीड शहरास अमृत अटल पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करुन पाणीपुरवठा तत्काळ सुरू करणेबाबत निर्देश दिले.

जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन मुख्य उद्‌भव ते काडीवडगाव पाईपलाईनचे काम, काडीवडगावच्या रस्त्यातील पुलावरील पाईपलाईनचे काम, तसेच काही ठिकाणच्या गंजलेल्या पाईपलाईन बदल करण्याचे काम तत्काळ नियोजन करून एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी नगराध्यक्षांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तत्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले व पाईपलाईनच्या कामात संबंधित विभागाला योग्य ते सहकार्य करणेबाबत विनंती केली. शेतकऱ्यांनी देखील नगराध्यक्षांच्या विनंतीला मान देत बीड शहरासाठी होत असलेल्या नवीन पाईपलाईनच्या कामात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, पाणीपुरवठा सभापती शेख इलियास, यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक शेतकरी बांधव उपस्थित होते.

===Photopath===

230321\165123bed_6_23032021_14.jpg

===Caption===

शहरासाठी माजलगाव बॅक वॉटर मधून अमृत अटल योजनेच्या माध्यमातून नवीन पाईप लाईनचे काम सुरू आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी काडीवडगाव येथील माजलगाव बॅक वॉटर येथे जाऊन अमृत अटल योजने संदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

Web Title: Complete the remaining work of Amrut Atal Yojana's new pipeline as soon as possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.