अपघात रोखण्यासाठी रखडलेल्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा : आ. नमिता मुंदडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:47 PM2021-02-18T17:47:14+5:302021-02-18T17:55:21+5:30

अंबाजोगाईत रस्ते विकास महामंडळाची बैठक पार पडली यात आ. नमिता मुंदडा यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.

Complete road works on time; Due to the increase in the number of accidents. Mundada's instructions to the authorities | अपघात रोखण्यासाठी रखडलेल्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा : आ. नमिता मुंदडा

अपघात रोखण्यासाठी रखडलेल्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा : आ. नमिता मुंदडा

googlenewsNext
ठळक मुद्देरखडलेल्या रस्त्यांच्या कामाकडे आ. मुंदडांनी लक्ष वेधून अधिकाऱ्यांना केल्या सूचनाकेज-नेकनूरमधील रस्त्यांचे रूंदीकरण करा पुलाच्या बाजूला डांबरीकरणाचे डायर्व्हशन तयार करा 

अंबाजोगाई -   रस्त्याच्या रखडलेल्या कामाने व वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींनी अंबाजोगाई व परिसरात अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. हे वाढते अपघात रोखण्यासाठी रखडलेले  रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा. अशी सूचना आ. नमिता मुंदडा यांनी केली. 

अंबाजोगाईत शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने आ. नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना आ. नमिता मुंदडा बोलत होत्या.  या बैठकीस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, युवानेते अक्षय मुंदडा, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, एच.पी.एम. कंपनीचे संचालक अजय देशमुख, तांत्रिक सल्लागार रविकुमार, अभियंता निवृत्ती शिंदे, विकास देवळे यांची उपस्थिती होती. 

या बैठकीत आ. नमिता मुंदडा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे विविध  समस्यांवर लक्ष वेधले.   पिंपळा ते मांजरसुंबा या ८२ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत मंद गतीने सुरू असलेल्या या कामामुळे रहदारीस अनेक ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत. काम सुरू करण्याअगोदरच रस्त्यांवर खड्डे खोदून ठेवण्यात येत असल्याने याचा मोठा त्रास वाहनचालकांना होतो. या रखडलेल्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे लवकरात लवकर करून मुदतीपूर्वी काम पूर्ण करा. अशा सूचना त्यांनी दिल्या.  

तसेच जिथे पुलाचे काम सुरू आहे. तिथे  डांबरी रस्त्याचे डायर्व्हशन करा.  भाटुंबा व कळमअंबा येते चार नळ्यांचे पूल बांधण्यात यावेत. नेकनूर व केज शहरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. अंबाजोगाई शहरात लोखंडी सावरगाव ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. शहरातील भगवानबाबा चौक व यशवंतराव चव्हाण चौक यांचे सुशोभीकरण करा. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत रस्ते खोदू नका. अशा सूचनासुद्धा आ. मुंदडा यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीत कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी  पिंपळा ते मांजरसुंबा या रस्त्याच्या ८२  कि.मी. पैकी ७५ कि.मी. काम पूर्ण झाल्याचे सांगितले. आ. नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी या बैठकीत दिले.  या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख, अ‍ॅड. संतोष लोमटे, अनंत आरसुडे, अमोल जाधव, रमाकांत पाटील, अविनाश मुडेगावकर, अभिजित जगताप, रमाकांत उडाणशिव यांची उपस्थिती होती.

Web Title: Complete road works on time; Due to the increase in the number of accidents. Mundada's instructions to the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.