लोकन्यायालयातून सामोपचाराने तडजोड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:28+5:302021-09-10T04:40:28+5:30
शिरूर कासार : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक २५ सप्टेंबर रोजी शिरूर कासार येथील ...
शिरूर कासार : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक २५ सप्टेंबर रोजी शिरूर कासार येथील न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन सामोपचाराने तडजोड करण्याचे आवाहन येथील विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्या. ए.टी. मनगिरे यांनी केले.
प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरण, बँकेची कर्ज प्रकरणे, धनादेशाबाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगरपंचायतची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगीची प्रकरणे आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता लोकन्यायालयाचे आयोजन कोविड नियमावलीचे पालन करून करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली न्यायालयात दाखल असलेली व दाखल पूर्व प्रकरणे ही लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपसात तडजोड करून घ्यावीत. न्यायालयात येताना प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे, आपसात वैयक्तिक अंतर राखणे व हँड सॅनिटाझरने हात स्वच्छ धुऊनच प्रवेश करावा आणि लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्या. मनगिरे यांनी केले आहे.