केज नगर पंचायतीमध्ये संगणकीकृत करभरणा प्रणाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:47+5:302021-08-20T04:38:47+5:30
पहिल्या दिवशी संगणकीकृत कर प्रणालीद्वारे ५ मालमत्ताधारकांचा १९ हजार २७० रुपयांचा कर भरणा करून घेण्यात आला व संगणकीकृत कर ...
पहिल्या दिवशी संगणकीकृत कर प्रणालीद्वारे ५ मालमत्ताधारकांचा १९ हजार २७० रुपयांचा कर भरणा करून घेण्यात आला व संगणकीकृत कर पावत्यांचे वितरण प्रशासक शरद झाडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर पंचायतीचे स्वच्छता निरीक्षक असद खतीब, रचना सहाय्यक ज्ञानेश्वर पोटे, नगर अभियंता शुभम हासबे, जी. के. शिरसाठ, अनवर, आयुब पठाण, रफीक कुरेशी, मिथुन गुंड, भीमराव मस्के, सय्यद अतिक, अजिम इनामदार, कोअर प्रोजेक्टचे मॅनेजर मंगेश शेटे, चेतन माईते व इतर कर्मचारी हजर होते. मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. कर अधीक्षक माधव बोधगिरे यांनी आभार मानले.
160821\32421448-img-20210815-wa0027.jpg
केज नगर पंचायत मधील संगणकीकृत कर भरणा प्रणालीचा शुभारंभ करताना उपजिल्हाधिकारी शरद झाडके, मुख्याधिकारी सचिन देशपांडे व नगर पंचायतचे कर्मचारी.