धर्मापुरीत श्रावणमास तपोनुष्ठानाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:41 AM2021-09-10T04:41:24+5:302021-09-10T04:41:24+5:30
परळी : धर्मापुरी येथील श्री क्षेत्र मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थानात १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या श्री गुरुवर्य नंदिकेश्वर शिवाचार्य ...
परळी : धर्मापुरी येथील श्री क्षेत्र मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थानात १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या श्री गुरुवर्य नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या २० व्या श्रावणमास तपोनुष्ठान कार्यक्रमाची ८ सप्टेंबर रोजी सांगता झाली. यावेळी उदगीर येथील शंभुलिंग शिवाचार्य महाराज, मुखेड येथील डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, जिंतूर येथील अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, देवणी येथील सिद्धलिंग शिवाचार्य महाराज आदी उपस्थित होते. यावेळी श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांची नारळ तुला करण्यात आली. यावेळी श्रीक्षेत्र मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ॲड. गोविंदराव फड, वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, लिंगायत समाजाचे नेते डॉ. सुरेश चौधरी, ॲड. प्रभूअप्पा हालगे उपस्थित होते. शि.भ.प. विश्वनाथ स्वामी वडवळकर यांचे गुरू प्रसादाचे कीर्तन झाले.
यावेळी नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर परिसरात विकास योजना आणण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी येत्या सहा महिन्यांच्या आत पेव्हर ब्लॉक बसवून पत्राचे शेड उभारण्यात येईल व भक्तांची सोय करण्यात येईल, असे श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर कमिटी अध्यक्ष ॲड. गोविंद फड यांनी सांगितले. यावेळी धर्मापुरी, पट्टीवडगाव घाटनांदुर, गिरवली, परळी, गंगाखेड, सोनपेठ, अंबाजोगाई, लातूर, बर्दापूर, ईसाद उजनी पानगाव, रेणापूर, कोष्टगावसह इतर ठिकाणचे भजनी मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गोविंद फड, कैलास वाघमारे, श्रीमंत दामा, चंद्रशेखर कोळगावे, प्रकाश खानापुरे, वैजनाथ दामा, शिवराज आप्पा शिगे, उद्धव गिराम, राधाकिशन रणबावरे, लक्ष्मण कापसे, बाळू ठमके, गौरव सलगरे, विशाल बेलुरे, चंद्रकांत रणबावरे, शिवाहार कोळगावे, विनायक नवटाके, लक्ष्मण फड, उमाशंकर कोळगावेसह समाज बांधवांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन कपिल बुरांडे व अशोक फड यांनी केले.