ढोरवाडीत परस्परविरोधी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:09+5:302021-04-01T04:34:09+5:30
बीड : वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल ...
बीड : वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जगन्नाथ लक्ष्मण थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शेतात कामानिमित्त जात होते. यावेळी आरोपी शिवीगाळ करत होते. याठिकाणी शिव्या देऊ नका, असे म्हटल्याचा राग आल्याने रात्रीच्या सुमारास बोलावून त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गोरख तुळशीराम बाबर, शिवाजी उत्तम काळे व अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात भगवान अंकुश मदने यांच्या फिर्यादीवरून ते पाहुण्यांना सोडण्यासाठी जात होते. यावेळी ‘तू बाहेर का आलास’ असे म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. त्यावरुन अर्जुन रामभाऊ थोरात, जगन्नाथ लक्ष्मण थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शेख व सहाय्यक फौजदार वडमारे करत आहेत.