शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:30+5:302021-03-16T04:33:30+5:30

बीड : चारचाकी गाडीमध्ये डिझेल भरल्यानंतर कर्मचाऱ्याने पैसे मागितले असता ‘पैसे देत नाही’, असे म्हणत तेथील कर्मचाऱ्यासह व्यवस्थापकाला ...

Confusion of Shiv Sainiks in police station | शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यात गोंधळ

शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यात गोंधळ

Next

बीड : चारचाकी गाडीमध्ये डिझेल भरल्यानंतर कर्मचाऱ्याने पैसे मागितले असता ‘पैसे देत नाही’, असे म्हणत तेथील कर्मचाऱ्यासह व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेची माहिती कळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पेट्रोल पंपावर झालेल्या झटापटीनंतर दोघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यास या शिवसैनिकाने शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीपान दत्तोबा बडगे (रा. बेलखंडी पाटोदा) व अभिषेक आसाराम पवळ (रा. संभाजीनगर, बीड) हे दोघे रविवारी सायंकाळच्या सुमारास चऱ्हाटा फाट्यावर असलेल्या उबाळे यांच्या पेट्रोल पंपावर चारचाकी (क्र. एमएच २३- एएक्स ५९३९) घेऊन आले होते. यावेळी त्याठिकाणी त्यांनी डिझेल भरले. त्यानंतर तेथील कर्मचारी आकाश शिंदे यांनी डिझेलचे पैसे मागितले. पैसे का मागितले या कारणावरून आकाश शिंदे यास मारहाण केली. त्यामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेले मॅनेजर अमोल कदम यांनाही शिवीगाळ करण्यात आली. त्यांनी या घटनेची माहिती शिवीजीनगर पोलिसांना दिली. दरम्यान जालिंदर बनसोडे व अन्य कर्मचारी त्याठिकाणी पंपावर धाव घेतली. त्यावेळी पंपावरील कर्मचारी शिंदे व कदम यांना पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर संदीपान बडगे आणि अभिषेक पवळ हे दोघे ठाण्यात आले, त्यावेळी त्यांची बाचाबाची झाली. यावेळी बनसोडे यांना बडगेंनी शिवीगाळ केली. या प्रकरणी बनसोडे यांच्या फिर्यादीवरून संदीपान बडगे व अभिषेक पवळ या दोघांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाकडून दोघांविरुद्ध एनसी दाखल केली आहे.

पोलिसाने मारहाण केल्याचा आरोप

पेट्रोल पंपावरील गोंधळानंतर बडगे व पवळ यांना ठाण्यात घेऊन येत असताना, त्यांना पोलीस कर्मचारी बनसोडे यांनी मारहाण केली. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. तर याप्रकरणी आरोपीकडून देखील गुन्हा दाखल केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Web Title: Confusion of Shiv Sainiks in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.