मतदार यादीचा घोळ; दोषींवर गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:03 AM2021-03-04T05:03:01+5:302021-03-04T05:03:01+5:30

नगर पंचायतच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणीत वाॅर्डांत रहिवासी नसलेल्या अथवा त्या वाॅर्डाशी संबंध नसलेल्यांचा समावेश ...

Confusion of voter list; Report offenses to the guilty | मतदार यादीचा घोळ; दोषींवर गुन्हे नोंदवा

मतदार यादीचा घोळ; दोषींवर गुन्हे नोंदवा

Next

नगर पंचायतच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणीत वाॅर्डांत रहिवासी नसलेल्या अथवा त्या वाॅर्डाशी संबंध नसलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकर्षाने वाॅर्ड नंबर सोळामधे हा घोळ मुद्दामहून घातला गेल्याचे दिसून येते. हे हरकतीचे मतदान यादीतून बाहेर काढावे. यासाठी पंचांसमक्ष पडताळणी करावी व वाॅर्डातील खरे मतदान कायम ठेवण्यात यावे, अन्यथा उपोषण केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ज्यांनी हा घोळ घातला, त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणीदेखील निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्याकडे करण्यात आली आहे. बाळू बोराडे, फय्याज शेख, नागेश गाडेकर, प्रकाश खारोडे, हनुमंत गायकवाड, महेश औसरमल, राम गायकवाड, आशिष गाडेकर, दिनेश गाडेकर यांनी ही मागणी केली आहे.

Web Title: Confusion of voter list; Report offenses to the guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.