जयदत्तअण्णांना विजयी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:43 PM2019-10-10T23:43:11+5:302019-10-10T23:45:04+5:30
स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
बीड : मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कारभार केला नाही तर संसार केला. बीड जिल्ह्यातील आमदारांची एकमूठ वज्रमूठ होती म्हणून बीड जिल्ह्याचा विकास झाला. राष्ट्रवादी चांगल्या माणसाला संपवण्याचे काम करते हा इतिहास आहे. या इतिहासाची उजळणी करूनच नेते आणि पदाधिकारी स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीचे लोक भाजपा-शिवसेनेत येत आहेत. स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
रायमोहा येथे बीड मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांची गुरुवारी जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, आ.सुरेश धस यांना भाजपात घेतले आणि तेथून पुढे मेगा भरतीला सुरूवात झाली आता आमचा पक्ष हाऊसफुल्ल झाला आहे. गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्याचा विकास करताना मतभेद केला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब जगताप, संगिता चव्हाण, डॉ.योगेश क्षीरसागर, सर्जेराव तांदळे, दशरथ वनवे, राजेंद्र मस्के, मुन्ना फड, बाळासाहेब अंबुरे, बप्पासाहेब घुगे, नितीन धांडे, सागर बहीर, रोहीत क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, गणपत डोईफोडे, अरूण बोंगाणे, गणेश उगले, वसंत सानप, हनुमान पिंगळे, जगदीश काळे, जयश्री मुंडे, मधुसूदन खेडकर, भारत सोन्नर, सतीश सुरवसे, राजेंद्र बांगर, संपदा गडकरी, प्रकाश खेडकर, परमेश्वर सातपुते, गणेश उगले इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यकर्ता केंद्रस्थानी
बीड जिल्ह्यातील कार्यकर्ता हा मला केंद्रस्थानी आहे. घरचे लोक मला सोडून गेले, अडचणीच्या काळात तेव्हा कार्यकर्ता फाटके कपडे घालून काम करत होता. त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मी करत आहे. जिल्ह्यात सहाही आमदार महायुतीचे निवडून आले पाहिजेत, बीडमधून जयदत्त क्षीरसागरांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, आम्ही सर्व युती म्हणून एका दिशेने जाणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आमच्या पंखाला बळ देताना विजयाची जोड लावा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.