दिलासा; आता बीडमध्येही होणार म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:23+5:302021-06-09T04:41:23+5:30

बीड : मागील काही दिवसांपासून म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यावर केवळ अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात ...

Consolation; Bead surgery will now also be performed in Beed | दिलासा; आता बीडमध्येही होणार म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया

दिलासा; आता बीडमध्येही होणार म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया

Next

बीड : मागील काही दिवसांपासून म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यावर केवळ अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात तपासणी, निदान आणि शस्त्रक्रिया होत होत्या. आता बीड जिल्हा रुग्णालयातही या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी लागणारे साहित्य आणि विशेष तज्ज्ञांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. यासह या रुग्णांसाठी ३० ऑक्सिजन खाटा असलेला स्वतंत्र कक्षही तयार केला आहे.

जिल्ह्यात १३ मे रोजी म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत ही संख्या सोमवारपर्यंत १४३ वर पोहचली आहे. तसेच १९ जणांचा बळी गेला आहे. आगोदरच कोरोनाने हैराण झालेली जनता आणि प्रशासनासमोर या नव्या आजाराचा पेच निर्माण झालेला आहे. दुर्दैव म्हणजे जिल्ह्यात केवळ अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातच या आजाराचे निदान आणि उपचार होत आहेत. त्यामुळे येथेही गर्दी होत असल्याचे दिसते. दरम्यान, आजाराचे गांभीर्य पाहता बीड जिल्हा रुग्णालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष तज्ज्ञांसह साहित्य खरेदीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. याला मान्यता मिळताच या आजाराची तपासणी, निदान आणि उपचार बीडमध्येच होणार आहेत. त्यामुळे याला लवकर मान्यता देण्याची मागणी होत आहे. सध्या जिल्ह्याचे नोडल ऑफिसर म्हणून डॉ.बाबासाहेब ढाकणे हे असून, समन्वयक म्हणून डॉ.अशोक हुबेकर हे काम पाहत आहेत.

असे असेल नियोजन

साहित्य खरेदी झाल्यावर शस्त्रक्रियागृहात स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. येथे डॉ. अर्जुन तांदळे व जयश्री उबाळे यांच्यावर जबाबदारी असेल. त्यानंतर तयार केलेल्या स्वतंत्र कक्षात ३० ऑक्सिजन खाटा असून, याची जबाबदारी डॉ. अभिषेक जाधव यांच्याकडे असेल. डॉ. मीनाक्षी साळुंके व डॉ. चंद्रकांत वाघ हे त्यांच्या मदतीला असणार आहेत.

कोण करणार शस्त्रक्रिया?

जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याइतपत सध्या तरी कोणीही तज्ज्ञ नाही. त्यामुळे खाजगी सराव करणारे ईएनटी, दंतरोग तज्ज्ञ यांची मदत घेतली जाणार आहे. रुग्णालयात साहित्य उपलब्ध होईपर्यंत ते त्यांच्या खाजगी रुग्णालयातील साहित्य देणार आहेत. प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी त्यांना मानधन ठरवून दिले जाणार आहे. याचा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

---

सध्या संशयितांना अंबाजोगाईला पाठविले जात असून तिथेच तपासणी, निदान आणि उपचार केले जात आहेत. आता बीड जिल्हा रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांशी बैठक झाली आहे. याला लवकरच मान्यता मिळेल.

डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

---

अशी आहे आकडेवारी

एकूण रुग्ण १४३

उपचाराखालील रुग्ण ९८

मृत्यू १९

डिस्चार्ज कार्ड न घेताच निघून गेलेले ६

बरे झालेले २०

---

८९ पुरुष

५४ महिला

---

कोरोना इतिहास असलेले १४०

इतिहास नसलेले ३

---

वयोगटानुसार

० ते १८ - १

१८ ते ४५ - ३९

४५ ते ६० - ४९

६० पेक्षा जास्त - ५४

===Photopath===

070621\07_2_bed_4_07062021_14.jpg

===Caption===

डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

Web Title: Consolation; Bead surgery will now also be performed in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.