दिलासा; नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:45+5:302021-05-20T04:36:45+5:30

जिल्ह्यात मंगळवारी ४ हजार ६८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात ३ ...

Consolation; More coronal free than new constraints | दिलासा; नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

दिलासा; नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

Next

जिल्ह्यात मंगळवारी ४ हजार ६८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात ३ हजार ९३ अहवाल निगेटिव्ह आले तर ९७५ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ३२७, अंबाजोगाई ७९, आष्टी ९४, धारुर ५६, गेवराई ७०, केज १०८ , माजलगाव ५३, परळी ३०, पाटोदा ८८, शिरुर ४९ आणि वडवणी तालुक्यातील २१ जणांचा समावेश आहे. तसेच मंगळवारी जुन्या १९ व २४ तासातील १७ अशा एकूण ३६ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. आता एकूण बाधितांचा आकडा ७७ हजार ७०१ इतका झाला आहे. पैकी ६९ हजार ९८९ जण कोरोनामुक्त झाले असून १५६७ मृत्यू झाले आहेत. सहा हजार १२० जणांवर उपचार सुुरू असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.

Web Title: Consolation; More coronal free than new constraints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.