दिव्यांग शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:29 AM2021-04-26T04:29:55+5:302021-04-26T04:29:55+5:30

आष्टी : सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ...

Consolation to the teachers and staff of Divyang schools | दिव्यांग शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना दिलासा

दिव्यांग शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना दिलासा

Next

आष्टी : सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केलेला शब्द पाळून महिनाभरातच दिव्यांग अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रकारची आर्थिक भेट दिल्याचे शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी सांगितले. दिव्यांग शाळेतील ४८९९ शिक्षक व ६१५९ अन्य कर्मचारी अशा एकूण ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्र्यांनी घोषित केले आहे. मागील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय २३ एप्रिल २०२१ रोजी जारी केला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासनमान्य अनुदानप्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील ११ हजार ५८ शिक्षक - कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी होती. त्याअनुषंगाने मुंडे यांनी एक अभ्यासगट नेमून सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्याची पूर्तता करत विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. याबद्दल राज्यभरातील शिक्षक - कर्मचारी संघटनांनी तसेच शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने राज्य सरकारला धन्यवाद दिले आहेत.

Web Title: Consolation to the teachers and staff of Divyang schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.