प्रत्येक ५०० लोकसंख्येच्या वस्तीसाठी संविधान भवन; धनंजय मुंडे यांनी केली घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 06:11 PM2021-10-15T18:11:40+5:302021-10-15T18:14:24+5:30
Dhananjay Munde : यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि वाचनालय असेल
बीड : राज्यातील ५०० लोकवस्तीसाठी एक अद्यावत संविधान भवन ( Sanvidhan Bhavan for every 500 population village ) उभारण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. या योजनेबाबत शासन निणर्य झाला असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
संविधान भवन ही योजना सामाजिक न्याय विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. यात प्रत्येक ५०० लोकसंख्या असलेल्या वस्तीत संविधान भवन उभारण्यात येणार आहे. या वास्तूमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल. तसेच भव्य वाचनालय, ई- वाचनालय आदी अद्यावत सोयीसुविधांचा समावेश या भवनात असणार आहे.
पंकजांनी केंद्राकडून अधिक मदत मिळवून द्यावी
राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी वाटत असेल तर पंकजा मुंडेनी आपली ताकद वापरून केंद्राकडून अधिकची मदत मिळवून द्यावी. युपीएच्या काळात मनमोहन सिंह प्रधानमंत्री असताना, तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी विदर्भासाठी केंद्राचे वेगळं पॅकेज जाहीर केलं होतं. आता ही बाधित शेतकऱ्यांसाठी वेगळे पॅकेज जाहीर करण्यासाठी पंकजांनी प्रयत्न करावेत, बाधित शेतकरी आनंदीच होईल, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.