कॉन्टॅक्ट ट्रेसिंग; आरोग्य मंत्र्यांकडून पुन्हा स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:05+5:302021-06-19T04:23:05+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात बीड जिल्हा अव्वल आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात बीड जिल्हा अव्वल आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बीड आरोग्य यंत्रणेचे पुन्हा एकदा स्वागत केले. आतापर्यंत जिल्ह्यात १५ लाख ७० हजार २९२ लोकांचा शोध घेतला असून याचा टक्का १७.४१ एवढा आहे. तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही यंत्रणेला टोपे यांनी दिल्या.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बीडने कोरोनाला वेशीवरच रोखले होते. ग्रामीण भागासह शहरांत उपाययोजना केल्या जात होत्या. १८ एप्रिलला पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद झाली तर १६ मे रोजी जिल्हा रुग्णालयात पहिला रुग्ण दाखल झाला. त्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली. जे हाय रिस्कमध्ये होते त्यांचे स्वॅब घेण्यात आले तर लो रिस्क असलेल्यांना गृह व संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. पहिल्या लाटेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा टक्का २५ पर्यंत गेला होता. यावेळी जिल्हा राज्यात अव्वल असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे स्वागत करत बीड पॅटर्न राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही जिल्ह्याने गती कायम ठेवली आहे.
दरम्यान, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यात मंत्री टोपे यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबद्दल यंत्रणेचे स्वागत केले. तसेच चाचण्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
उपचाराचा दर्जा वाढवा, मृत्यूचे ऑडिट करा
जिल्ह्याचा मृत्यूदराबद्दल आरोग्य मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. मृत्यूचे ऑडिट करुन त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात व मृत्यूदर कमी करा, अशा सूचना टोपे यांनी दिल्या. तसेच उपचाराचा दर्जा वाढवून रुग्णांचा विश्वास जिंकण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
---
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबद्दल सुरुवातीपासूनच नियोजन केलेले आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. तसेच आठवड्याला याचा आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचे मार्गदर्शन आणि सर्व तालुका, वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्यानेच आम्ही हे यश संपादन करत आहोत. हे श्रेय शिपाई ते अधिकारी या सर्व टीमचे आहे.
-डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
===Photopath===
180621\18_2_bed_16_18062021_14.jpg
===Caption===
डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड